भुसावळ । भुसावळ शहरातील नहाटा चौफुली परिसरातील बंद घर फोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख १० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींच्या पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यातील मुसक्या आवळल्या आहेत. दोघांकडून चोरीतील ६८ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
भुसावळातील नहाटा चौफुलीजवळ राहणारे शिवदास दौलत पाटील यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातून रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख १० हजारांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना ७ नोव्हेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील आरोपी हे गडचिरोली येथे असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार पथक गडचिरोलीला रवाना झाले. दरम्या गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज गावात सापडा रचून संशयित आरोपी व्यंकटी रामा गोडमारे (वय-३८) आणि हितेश देवीदास ठेंगरी (वय-२८) दोन्ही रा. देसाईगंज जि. गडचिरोली यांना अटक केली. दोघांकडून चोरीतील ६८ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. पुढील तपास उमाकांत पाटील करीत आहे
Discussion about this post