मुक्ताईनगर । गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस बाळगणाऱ्या मुक्ताईनगरातील दोघांच्या वरणगाव पोलिसांनी गोपनीय माहिती मुसक्या आवळल्या आहेत. सिध्दार्थ संतोष भालेराव (वय २३, डॉ. आंबेडकरनगर, मुक्ताईनगर) व अनिरूध्द कैलास ठाकूर (वय २०, सुराणा नगर, मुक्ताईनगर) असं अटक केलेल्या दोघांची नाव असून याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत असे की, वरणगाव शहरातील हॉटेल चायला जवळ संशयीत शस्त्रासह येणार असल्याची माहिती वरणगावचे सहाय्यक निरीक्षक भरत चौधरी यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. वरणगाव पोलिसांनी आरोपी सिध्दार्थ संतोष भालेराव व अनिरूध्द कैलास ठाकूर या दोघांना ताब्यात घेतले.
संशयीतांच्या अंग झडतीत त्यांच्याकडून २५ हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा, ४ हजार रुपये किंमतीचे २ जिवंत काडतूस तसेच ५ हजार रुपये किंमतीचे मॅग्झीन जप्त करण्यात आले. पोलीस कॉन्स्टेबल मनोज म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक रामदास गांगुर्डे करीत आहे.
Discussion about this post