भुसावळ । दाखल असलेल्या प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड रायटर तुषार पाटील व खाजगी पंटर ऋषी दुर्गादास शुक्ला असे या तिघांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी बायोडिझेलची वाहतूक करणारा टँकर बाजारपेठ पोलिसांकडे कारवाईसाठी दिला होता. मात्र गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात 15 लाखांची मागणी करण्यात आलीव सुरूवातीला तीन लाख रुपये घेवून नंतर पुन्हा 12 लाख रुपये मागण्यात आल्याने तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. ऋषी शुक्ला व तुषार पाटील यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली तर पोलीस निरीक्षकांसाठी लाच मागण्यात आल्याने त्यांना देखील अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागावाचे पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील, पो. हवा राजन कदम, पो कॉ. संतोष पावरा, पो.कॉ.रामदास बारेला, पो. हवा चालक सुधीर मोरे
Discussion about this post