बलुचिस्तान | दोन स्फोटांनी पाकिस्तान हादरला. बलुचिस्तानमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 100 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी खैबर पख्तूनख्वामध्ये आत्मघाती स्फोट झाला. यामध्येही मृतांचा आकडा दुहेरी आकड्यांमध्ये नोंदवला जात आहे. मात्र, खैबर पख्तुनख्वामधील स्फोटाबाबत अद्याप सविस्तर माहिती उपलब्ध नसून खैबर पख्तुनख्वामध्ये मोठा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यातील अल-फलाह मशिदीजवळ ईद मिलाद-उल-नबीच्या मिरवणुकीत हा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी साप्ताहिक ईदच्या नमाजदरम्यान हा स्फोट झाला. नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम समाजाचे लोक मोठ्या संख्येने मशिदीत पोहोचले होते. यावेळी मिरवणुकीला लक्ष्य करून स्फोट घडवून आणण्यात आला. मृतांचा आकडा वाढू शकतो. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोट एवढा जोरदार होता की आजूबाजूचे लोकही हादरले. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट एका मशिदीजवळ झाला.
मात्र, कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही. इस्लामिक स्टेटच्या पाकिस्तान चॅप्टरने मस्तुंगमधील शेवटच्या मोठ्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती, परंतु यावेळच्या स्फोटाची जबाबदारी कोणीही घेतली नाही. इस्लामिक स्टेटच्या पाकिस्तानी चॅप्टरने यावेळीही मोठा स्फोट घडवून आणला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही संस्थेने जबाबदारी घेतली नाही
दरम्यान, बलुचिस्तानचे माहिती मंत्री जान अचकझाई यांनी सांगितले की, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला आहे. सध्या कोणत्याही संस्थेने जबाबदारी घेतलेली नाही. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जखमींना क्वेटाच्या वेगवेगळ्या रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. सध्या परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.
Discussion about this post