जळगाव : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस यानंतर झालेल्या भूसख्खलन झाल्याने हाहाकार उडाला आहे. यात अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाळले गेले असून या घटनेत अनेकजण येथे बेपत्ता झाले आहे. दरम्यान उत्तरकाशी दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील एकोणावीस जण अडकले आहेत.
त्यात जळगाव शहरातील तीन, पाळधी गावातील 13, धरणगाव येथील दोन तर पाचोरा येथील एका जवानाचा समावेश आहे. एकोणावीस जणांपैकी जळगाव शहरातील आयोध्या नगर येथील मेहरा कुटुंबातील तिघांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला आहे. मेहरा कुटुंबातील अनामिका मेहरा, आरोही मेहरा, रुपेश मेहरा हे सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
उर्वरित 16 जणांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. उत्तरकाशी येथे अडकलेल्या 19 जणांपैकी पाचोरा येथील एका जवानाचा देखील समावेश आहे. जिल्हा प्रशासनाकडून जळगाव जिल्ह्यातील उत्तरकाशी येथे अडकलेल्या भाविकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. उत्तरकाशी येथे अडकलेल्या 19 जणांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावातील 13 जणांचा समावेश आहे.
Discussion about this post