बुलढाणा : बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलीय. विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. बस थेट डिव्हायरला धडकली. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे.
ही खासगी बस नागपूरहून पुण्याला जात होती. रात्री 1 ते दीडच्या सुमारास हा अपघात झाला. मध्यरात्री समुद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा जवळील पिंपळखुटा गावात अचानक बस पलटी झाली.
बसमधील 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर चालकासह चारजण या अपघातातून बचावले आहेत. या बसमधून 30 प्रवाशी प्रवास करत होते.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा, महसूल विभाग, ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्यास सुरुवात केली.
Discussion about this post