धुळे । धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात साक्री तालुक्यातील गणेशपूर गावाच्या शिवारात पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत कांदा भरण्यासाठी आलेला ट्रॅक्टर ट्रॉली सह बुडाल्याने दोन मुली बेपत्ता झाल्या आहेत. यामध्ये ऋतिका संदीप गायकवाड (३) या बालिकेला मृतावस्थेत काढण्यात आले, अन्य एकीचा शोध अद्याप सुरूच असून ती कांद्याखाली दाबलीगेली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात येतो आहे.
या घटनेबाबत असे की, साक्री पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गणेशपूर गावाजवळ प्रकाश मराठे यांच्या शेतात कांदा भरण्यासाठी ट्रॅक्टर उभा करण्यात आला होता. विहिरीच्या शेजारी ट्रॅक्टर थांबलेला होता. ट्रॉलीत कांदे भरण्यात आले. होते आणि थोड्यावेळातच ट्रॅक्टर निघणार होते. यामुळे तेथील मजुरांना घराकडे परतण्याचे वेध लागले होते.
अशातच ही हृदयद्रावक घटना घडली. ट्रॅक्टरवर बसलेल्या खुशी दाजू ठाकरे (३) व ऋतिका संदीप गायकवाड (३) या कठडे नसलेल्या आणि पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली. ही घटना कळताच लोकांनी धाव घेतली आणि सुदैवाने या घटनेत परी संदीप गायकवाड (२) या बालीकेला वाचवण्यात यश आले.या घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
दरम्यान, ऋतिकाचे शव पाण्याबाहेर काढण्यात यंत्रणेला यश आल्याच्या माहितीला पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी आज सकाळी दुजोरा दिला. तर अन्य एकीचा शोध अद्याप सुरु आहे. विहिरीत पडलेल्या मुलींचा शोध घेण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.















Discussion about this post