Saturday, March 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

खिशावरचा भार वाढणार ! 1 एप्रिल वार्षिक टोल पास ‘इतक्या’ रुपयांना मिळणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 14, 2026
in राष्ट्रीय
0
येत्या १ एप्रिलपासून महामार्गांवरील प्रवास महागणार ; ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार टोल टॅक्स ?
बातमी शेअर करा..!

जर तुम्ही तुमच्या कारनं वारंवार राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल आणि वार्षिक टोल पास वापरत असाल, तर आता तुमच्या खिशावरचा भार वाढणार आहे. १ एप्रिल २०२६ पासून राष्ट्रीय महामार्गावर मिळणारा वार्षिक टोल पास महाग होणार आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) वार्षिक टोल पासच्या किमतीत वाढ केली आहे. आता १ एप्रिल २०२६ पासून वाहनधारकांना या पाससाठी ३,००० रुपयांऐवजी ३,०७५ रुपये मोजावे लागणार आहेत.

वार्षिक टोल पासचे हे नवीन दर आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी लागू होतील. हा पास केवळ खाजगी वाहनांसाठीच उपलब्ध असतो आणि यासाठी वाहनामध्ये ‘ॲक्टिव्ह FASTag’ असणं अनिवार्य आहे.

२०० वेळा टोल ओलांडण्याची मर्यादा
वार्षिक टोल पास हा एक वर्षासाठी किंवा २०० वेळा टोल ओलांडण्यासाठी वैध असतो. याचा अर्थ असा की, जर एखाद्या वाहनाने २०० वेळा टोल प्लाझा ओलांडला, तर एक वर्ष पूर्ण होण्याआधीच त्या पासची वैधता संपेल.

टोल दरांमध्ये किरकोळ वाढ
नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियानं सर्व टोल प्लाझा आणि संबंधित अधिकाऱ्यांना १ एप्रिल २०२६ पासून नवीन दर लागू करण्याचे आणि याची माहिती प्रवासी व इतर भागधारकांना देण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, टोल दरांचा दरवर्षी आढावा घेऊन त्यात सुधारणा केली जाते. याच प्रक्रियेअंतर्गत यंदा वार्षिक पासच्या किमतीत किरकोळ वाढ करण्यात आली आहे. ज्या लोकांचे राष्ट्रीय महामार्गावरून रोजचं किंवा वारंवार येणं-जाणं असतं, त्यांच्यासाठी हा वार्षिक टोल पास अजूनही एक सोयीस्कर पर्याय मानला जातो. यामुळे वारंवार टोल भरण्याची समस्या कमी होते.

वार्षिक टोल पास कसा मिळवाल?
राष्ट्रीय महामार्गावर वारंवार प्रवास करणारे वाहनधारक सहजपणे वार्षिक टोल पास बनवू शकतात. ही सुविधा NHAI तर्फे दिली जाते. यासाठी वाहन मालक NHAI च्या पोर्टलवर किंवा त्यांच्या FASTag जारी करणाऱ्या बँक/ॲपवर लॉग-इन करून अर्ज करू शकतात. वार्षिक पाससाठी निर्धारित शुल्क ऑनलाईन भरावं लागेल. पेमेंट केल्यानंतर, हा वार्षिक पास तुमच्या FASTag शी लिंक केला जातो, त्यानंतर तुम्ही टोल प्लाझावर अतिरिक्त पैसे न भरता प्रवास करू शकता.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव येथे १६ मार्च रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार

Next Post

२१ वर्षांची प्रतीक्षा संपणार ! महाराष्ट्रात ३० हजार शिक्षकेतर पदांसाठी भरती होणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
२१ वर्षांची प्रतीक्षा संपणार ! महाराष्ट्रात ३० हजार शिक्षकेतर पदांसाठी भरती होणार

२१ वर्षांची प्रतीक्षा संपणार ! महाराष्ट्रात ३० हजार शिक्षकेतर पदांसाठी भरती होणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
२१ वर्षांची प्रतीक्षा संपणार ! महाराष्ट्रात ३० हजार शिक्षकेतर पदांसाठी भरती होणार

२१ वर्षांची प्रतीक्षा संपणार ! महाराष्ट्रात ३० हजार शिक्षकेतर पदांसाठी भरती होणार

March 14, 2026
येत्या १ एप्रिलपासून महामार्गांवरील प्रवास महागणार ; ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार टोल टॅक्स ?

खिशावरचा भार वाढणार ! 1 एप्रिल वार्षिक टोल पास ‘इतक्या’ रुपयांना मिळणार

March 14, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

जळगाव येथे १६ मार्च रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार

March 14, 2026
सावधान! राज्यातील १५ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट

जळगावसह महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट; वादळी वाऱ्यासह गारपीटचा इशारा, बळीराजावर चिंतेचे सावट

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page