पावसाळा म्हणजे प्रत्येकासाठी आनंदाचा हंगाम. मात्र, कधी कधी हा आनंद दु:खद ठरतो. अशीच एक हृदयद्रावक घटना नुकतीच घडली असून तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल (VIRAL)होत असलेल्या व्हिडिओत स्पष्टपणे दिसतं की, लहान मुलं आनंदाने पावसात खेळत आहेत. एकमेकांवर पाणी फेकत आहेत, हसत आहेत. काही वेळाने अचानक एक चिमुकला खेळता खेळता खड्ड्यात पडतो. क्षणात त्याचा पत्ता लागत नाही. मात्र चिमुकला खड्ड्यात पडल्यानंतर अन्य मुलांनी किंचाळण्यास सुरुवात केली. धक्कादाय म्हणजे चिमुकली बाहेर खेळत असताना कोणतीही मोठी व्यक्ती त्यांच्या सोबत नाही.
या घटनेचा संपूर्ण थरारक प्रसंग घराजवळ असलेल्या सीसीटीव्हीत कैद झालेला आहे. काही दिवसात ही घटना वाऱ्याच्या वेगाने देशभर व्हायरल झाली आणि सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील vaishnodevi_maa_2000 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कोणत्या शहरातील आहे ते अद्याप समजलेले नाही.
Discussion about this post