मुंबई /जळगाव । ऑगस्ट महिन्यात सुटीवर गेलेला पाऊस राज्यात परतला आहे. राज्यातील अनेक भागांत आता श्रावण सरीचा अनुभव येत आहे. आज रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील गेल्या दोन दिवसापासून पावसाच्या सरी बरसात असल्याने शेतकरी राजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
या जिल्ह्यांना आज अलर्ट जारी
राज्यातील नागपूर आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट रविवारी दिला आहे. या भागांत मुसळधार पाऊस कोसळणार आहे. गडचिरोली, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, जालना, बीड , लातूर या जिल्ह्यास यलो अलर्ट दिला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट रविवारसाठी जारी केला आहे. सोमवारी संपूर्ण मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात सोमवारसाठी यलो अलर्ट दिला आहे.
बंगालच्या उपसागरात बदल
उत्तर-पूर्व बंगालच्या उपसागरात बदल झाले आहे. या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.यामुळेच हिमाचल प्रदेशत सध्या अतिवृष्टी झाली आहे. आता मात्र हा कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशकडे आला आहे. यामुळे राज्यात विदर्भात पाऊस सुरु झाला आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र् आणि मराठवाडा या भागांत हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पुढील पाच दिवस पडतील, असा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Discussion about this post