मुंबई । देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात पेट्रोल ५५ पैशांनी तर डिझेल ५३ पैशांनी महागलं आहे.
हिमाचल प्रदेश आणि गोव्यातही पेट्रोल-डिझेल महाग झाले आहे. पंजाबमध्ये आज पेट्रोल (Petrol) ६० पैशांनी आणि डिझेल ५८ पैशांनी स्वस्त झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोलच्या दरात ४६ पैशांची तर डिझेलच्या (Diesel) दरात ४३ पैशांची घसरण झाली आहे. गुजरातमध्येही पेट्रोल स्वस्त झाले आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर, राजस्थान, तामिळनाडूमध्येही इंधनाचे दर घसरले आहेत. दुसरीकडे तेलंगणात पेट्रोल १.४८ रुपयांनी तर डिझेल १.३९ रुपयांनी महागले आहे.
चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर
– दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.७३ रुपये आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर
– कोलकाता में पेट्रोल १०६.०३ रुपये और डीजल ९२.७६ रुपये प्रति लीटर
तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.
Discussion about this post