मागील गेल्या काही दिवसापासून सोने-चांदीच्या भावात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. सोन्याचे भाव महिन्याभरापूर्वी कमी झाले होते. मात्र, आता पुन्हा सोन्याचे भाव ७५ हजारांच्या पार गेले आहेत. एकीकडे सणासुदीचे दिवस सुरु असून यात सोने-चांदीचे भाव वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मात्र फटका बसत आहे.
येत्या १५ दिवसात नवरात्र सुरु होणार आहे. त्यानंतर दसरा, दिवाळी असे सण आहेत. त्यामुळे अनेकजण सोने-चांदी खरेदी करण्याच्या विचारात असतील. मात्र, सोने चांदीच्या वाढत्या भावामुळे नागरिकांना मात्र फटका बसत आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचे सोने-चांदीचे भाव.
या आठवड्यात पितृपक्षामुळे सोने-चांदीचे भाव घसरले होते. १७ सप्टेंबरला सोन्याच्या किंमत १५० रुपयांनी कमी झाल्या होत्या. तर १९ सप्टेंबर रोजी २५० रुपये कमी झाल्या होत्या. मात्र, आज सोन्याचे भाव वाढलेले दिसत आहेत.
काय आहेत भाव
२२ कॅरेट सोन्याची किंमत ६८,८६० रुपये प्रति तोळा आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७५,१२० रुपये प्रति तोळा आहे. तसेच चांदीचे दर ९२००० रुपये प्रति किलोवर आहे.
Discussion about this post