नवी दिल्ली : सध्या लग्नसराई सुरु आहे. गेल्या महिन्यात सोन्यासह चांदीच्या किमतीने भलामोठा डोंगर गाठल्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. मात्र उच्चांकी किमतीपासून दोन्ही धातूंचे दर घसरल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळताना पाहायला मिळत आहे. सोने आणि चांदीच्या किमतीत सातत्याने बदल होत असून सकाळी एक तर संध्याकाळी एक भाव यामुळे ग्राहकांना अंदाज बांधणे कठीण होत आहे.
दरम्यान, आज जून महिन्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात सोन्याचा भाव वधारला असून चांदीत कोणताही बदल झालेला नाही. 2 जून रोजी सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 300 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. तर चांदीने पण दरवाढीचे खाते उघडले. किलोमागे चांदी 600 रुपयांनी वधारली. 31 मे रोजी आणि 1 जून रोजी सकाळच्या सत्रात सोने-चांदीने भाव वाढ नोंदवली होती. आज 3 जून रोजी सकाळच्या सत्रात भाव जाणून घेऊयात..
goodreturns च्या आकडेवारीनुसार, 31 मे आणि 1 जून रोजी सकाळच्या सत्रात सोने-चांदी वधारली होती. तर 1 जून रोजी संध्याकाळच्या सत्रात चांदीत 150 रुपयांची घसरण झाली होती. 2 जून रोजी सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 300 रुपयांची वाढ झाली. आज 3 जून रोजी सकाळच्या सत्रात भावात 10 रुपयांची वाढ झाली. आता संध्याकाळपर्यंत दोन्ही धातूत काय बदल होतो, हे स्पष्ट होईल. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 56,160 रुपये तर 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 61,260 रुपये झाले.
24, 23, 22 कॅरेटचा भाव
ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,308 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 60,067 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,242 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,231 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.
Discussion about this post