आगामी सणासुदीपूर्वीच सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा जोरदार उसळी घेतली आहे. सोन्याची किंमत तब्बल ७३ हजारांच्या पार पोहचली आहे. सोने खरेदी करताना सामान्य व्यक्तींच्या खिशाला नक्कीच कात्री लागणार आहे.
गेल्या महिन्यात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील सीमा शुल्कात कपात करण्यात आल्यानंतर दोन्ही धातूच्या दरात मोठी घसरण पहायला मिळाली. सोन्याचे दर ७४ हजारावरून ६९ हजारापर्यंत घसरले होते. मात्र मागील काही दिवसापासून सोने दरात वाढ दिसून आली. सोबत चांदीही महाग होताना दिसून आली.
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला ७१ हजाराच्या खाली असलेला सोन्याचा भाव आता तब्बल ७३ हजारांच्या पार गेला. आज सोन्याचा भाव वाढला असला तरी चांदी मात्र कालच्या किंमतींवर स्थिर आहे. त्यामुळे आजच्या किंमती काय आहेत, त्याची माहिती जाणून घेऊ.
२२ कॅरेटचा आजचा भाव
आज २२ कॅरेट सोन्याचा भाव आज ६७,२५० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर १ ग्राम सोन्याची किंमत आज ६,७२५ रुपये इतकी आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत किती?
२४ कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव आज ७३,३५० रुपये आहे. १ ग्राम सोन्याचा भाव ७,३३५ रुपयांवर आहे.
चांदीचा भाव पाहू
आज चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. चांदीचा भाव कालच्या सारखाच आहे. काल चांदीचा भाव ८७,००० रुपये किलो होता. आज देखील राज्यातील विविध शहरांमध्ये चांदीचा भाव ८७,००० रुपये इतकाच आहे.















Discussion about this post