मुंबई । सोन्यासह चांदीच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. ऐन लग्नसराईत सोन्याच्या भावात वाढ झाल्यामुळे खरेदीदारांना टेन्शन आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते.
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याच्या भावाने उच्चांकाचा टप्पा गाठला होता.दिवाळीच्या काळात सोन्याचे भाव नरमले होते. परंतु, डिसेंबर महिन्यात सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.
गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८३५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,६४० रुपये मोजावे लागणार आहे. सोन्याच्या भावात आज २६० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीही (Price ) किंचित घट झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी ७९,००० रुपये मोजावे लागतील. आज चांदीतही १ किलोनुसार ५०० रुपयांनी घट झाली आहे.
1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती?
मुंबई – ६३,४९० रुपये
पुणे – ६३,४९० रुपये
नागपूर – ६३,४९० रुपये
नाशिक – ६२,५२० रुपये
ठाणे – ६३,४९० रुपये
अमरावती – ६३,४९० रुपये
Discussion about this post