मुंबई । सध्या सोने आणि चांदी दरात चढ उतार सुरु आहे. देशात थोड्याच दिवसात सणासुदीला सुरुवात होईल. रक्षाबंधन, नारळीपोर्णिमा असे सण आहेत. या सणांना अनेकजण सोने खरेदी करतात. मात्र सध्या देशभरात सोन्याचा दर लाखाच्यावर गेल्याने त्यामुळे सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न ग्राहकांना पडलेला आहे. दरम्यान आज सोने आणि चांदी खरेदीला प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे दोन्ही धातूंमध्ये आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी मोठी घसरण झाली आहे.
आजचे सोन्याचे दर
आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचे दर प्रति तोळा ४५० रुपयांनी घसरले आहेत. आज १ तोळा सोन्याचे दर १,००,०३० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८०,०२४ रुपये आहेत. या दरात ३६० रुपयांनी घसरण झाली आहे. १० तोळा सोन्याचे दर ४५०० रुपयांनी घसरण झाली आहे.१० तोळ्याचे दर १०,००,३०० रुपये आहेत.
२२ कॅरेट सोन्याचे दर
आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ९१,७०० रुपये आहेत. या दरात ४०० रुपयांनी घसरण झाली आहे. ८ कॅरेट सोन्याचे दर ३२० रुपयांनी घसरले असून हे दर ७३,३६० रुपये झाले आहेत. १० तोळा सोन्याचे दर ४,००० रुपयांनी घसरले आहेत. हे दर ९,१७,००० रुपये आहेत.
१८ कॅरेट सोन्याचे दर
आज १ तोळा सोन्याचे दर ७५,०३० रुपये आहेत. या दरात ३३० रुपयांनी घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६०,०२४ रुपये आहेत. या दरात २६४ रुपयांनी घसरण झाली आहे. १० तोळा सोन्याचे दर ७,५०,३०० रुपयांनी घसरले आहेत.
सोबतच चांदी दरात आज २००० रुपयाची घसरण झाली. यामुळे चांदीचा एक किलोचा भाव आता ११५००० रुपयावर पोहोचला आहे.
Discussion about this post