जळगाव । गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर, जळगाव सराफ बाजारात शनिवारी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. सोन्यासोबत चांदीच्या दरातही घट नोंदवली गेली. त्यामुळे ग्राहकांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला.
मागील काही दिवसांपासून उच्चांकी पातळीवर असलेल्या सोन्याच्या दरात अचानक झालेली घट सर्वसामान्य ग्राहकांसाठी आनंदाची बातमी मानली जात आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी सकाळी बाजार उघडल्यावर १०३० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसही एक लाख ३८ हजार ०२० रूपयांपर्यंत खाली आले.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी सकाळी बाजार उघडल्यावर १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ४३ हजार ८० रूपयांपर्यंत खाली आले.
लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सोने दरात झालेली घट महत्त्वाची संधी मानली जात आहे. अनेक जण सोन्याचे दर आणखी कमी होतील, या अपेक्षेने खरेदी पुढे ढकलताना दिसून येतात. मात्र, तज्ज्ञांचे मत वेगळे आहे. त्यांच्या मते, सोन्याचे दर कधीही पुन्हा वाढू शकतात. त्यामुळे सध्याचा काळ खरेदीसाठी योग्य ठरू शकतो.















Discussion about this post