जळगाव । सोने आणि चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना झटका देणारी बातमी आहे. कारण सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी वाढ झालीय. एकाच दिवसांत मोठी दरवाढ नोंदवली गेल्याने चांगलीच खळबळ उडाली.
काय आहे सोन्याचा दर
आज सोमवारी सकाळी बाजार उघडताच तब्बल १९५७ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २५ हजार ८६६ रूपयांवर जाऊन पोहोचले.
चांदीत २०६० रूपयांनी वाढ
जळगावमध्ये गेल्या तीन दिवसांपासून चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५४ हजार ५०० रूपयांवर स्थिरावले होते. मात्र, सोमवारी सकाळी बाजार उघडताच २०६० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५६ हजार ५६० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.
दरम्यान लग्नसराई सुरू झाल्याने सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातून सोने आणि चांदीसाठी मजबूत संकेत मिळाल्याने देशांतर्गत बाजारात मागणी वाढली आहे.तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात सोन्याच्या किमतीत आणखी चढ-उतार होऊ शकतात. तथापि, लग्नसराईचा हंगाम आधीच सुरू झाला आहे, जो सोन्याला आणखी आधार देईल.















Discussion about this post