मुंबई । सध्या सोने आणि चांदी दरात चढ उतार होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसात सोन्याची किंमत घसरण दिसून आल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. पण आज पुन्हा सोन्याने भरारी घेतली आहे.
लग्नसराई सुरू असतानाच सोनं आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्व सामान्यांना महागाईचा सामना करावा लागतो. आज २२ कॅरेटचं सोनं ४०० रूपयांनी तर २४ कॅरेटचे सोनं ४४० रूपयांनी वाढलेय. यांनतर आता २४ कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत ₹90,000 इतकी झाली आहे, तर २२ कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत ₹82,500 इतकी झाली आहे.
चांदीला चकाकी –
सोन्याशिवाय चांदीच्या किंमतीत ही वाढ झाली आहे. चांदीला सोन्याइतकी झळाळी मिळाली नाही. एक किलो चांदीची किंमत ११०० रूपयांनी वाढली आहे.
सोन्याची किंमती का वाढत आहेत?
सोन्याची किंमत वाढण्याची अनेक कारणे आहेत. यामधील प्रमुख कारण म्हणजे ट्रम्प सरकारच्या टॅरिफ नितीमुळे सुरू झालेला ट्रेड वॉर असे आहे. जगावर सध्या आर्थिक मंदीचे सावट आहे, त्यामुळे अनेकांचा कल सोनं खरेदीकडे जास्त आहे. सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानले जाते, त्यामुळे अनेकजण सोनं खरेदी करत आहेत. डॉलरच्या तुलनेत रूपयांची किंमत वारंवार घसरत आहे, त्यामुळेही सोन्याची किंमत नियमित वाढताना दिसत आहे.
Discussion about this post