मुंबई । सोने आणि चांदीच्या दरात चढ- उतार सुरूच असून लग्नसराईत पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. मागच्या दहा दिवसात सोन्याच्या दरात ११६० रुपयांनी घसरण झाली आहे. अशातच १४ फेब्रुवारीला एका दिवसात सोन्याच्या दरात ६०० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली.
मागच्या दोन ते तीन दिवसात सोन्याच्या भावात ३३० रुपयांनी वाढ झाली. काल सोन्याच्या भावात घसरण झाली होती. लग्नसराईच्या काळात धातूच्या किमतीत मोठा बदल झालेला पाहयला मिळाला आहे. कर आणि उत्पादन शुल्कामुळे सोन्या-चांदीची किंमत दररोज वाढत आणि कमी होत आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव
आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७७५ रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या भावात २५० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,८९० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात १८० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीतही (Price) वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी ७५,७०० रुपये मोजावे लागतील. चांदीच्या भावात प्रतिकिलोनुसार २०० रुपयांनी घसरण झालीये.
२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती?
मुंबई- ६२,७४० रुपये
पुणे – ६२,७४० रुपये
नागपूर – ६२,७४० रुपये
नाशिक – ६२,७७० रुपये
ठाणे – ६२,७४० रुपये
अमरावती – ६२,७४० रुपये
Discussion about this post