मुंबई । वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या किमतींनी ६२ हजार रुपये प्रति १० वर मुसंडी मारली होती, तर चांदीही ७८ हजारांच्या घरात पोहोचली होती. अशा स्थितीत लवकरच सोने ७० हजार तर चांदी ८० हजार रुपयांचा टप्पा पार करेल असे दिसत होते, पण मागील दोन महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात कमालीची घट झाली. मात्र सध्या बाजारात चढउताराचा काळ असून अशात तुम्ही आज सोने खरेदीचा विचार करत असाल तर तुम्हाला कालच्या तुलनेत जास्त किंमत मोजावी लागेल कारण सोने महागले असून चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे.
सराफा बाजारात सोन्याची किंमत १०० रुपयांनी वाढली असून चांदी ८०० रुपयांनी महागली आहे. गुडरिटर्न्स साइटनुसार २२ कॅरेट सोन्याचा भाव ५४ हजार २५० तर २४ कॅरेट शुद्ध सोन्यासाठी १० ग्रॅमसाठी ५९ हजार १६० रुपये मोजावे लागणार. याशिवाय चांदीचा भाव ८०० रुपये वाढीसह ७३ हजार रुपयांवर पोहोचली आहे.
MCX वर सोने-चांदीचा भाव
सोन्याच्या दरात घट झाल्यानंतर आता मौल्यवान धातूच्या किमती पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली आहे. आज, गुरुवारी सकाळी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत असून सोने आता ५९ हजार रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. MCX वर सोन्या-चांदीच्या किमती वाढताना दिसत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) गुरुवारी सोन्याचा भाव ५८ हजार ६३८ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला आणि ५८ हजार ४३५ रुपयांच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर घसरला. दरम्यान, MCX वर सकाळच्या सत्रात चांदी ७१ हजार ३५७ रुपये प्रति किलोवर खुला झाला आणि ७१ हजार २६५ रुपयांच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचली.
Discussion about this post