जळगाव । सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यानुसार जळगाव सुवर्ण बाजारात शुक्रवारी दिवसभरात कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळाले. सोन्यात पाचशे रुपयांची तर चांदीत अकराशे रुपयांची घट झाली. सोन्याचा आज भाव प्रतितोळा ५८ हजार ६०० रुपये तर चांदी किलोला ६९ हजार रुपये भाव होता.
लग्नसराईला काही प्रमाणात लागलेला ब्रेक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुरू असलेले चढ-उतार यामुळे हे भाव कमालीचे घसरल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
सोने आणि चांदीच्या भावाने फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान उच्चांक गाठला होता. मात्र, दरवाढीला मे महिन्यापासून काही प्रमाणात लगाम लागला असून, किमतीत सतत घसरणीमुळे खरेदीदारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भविष्यात सोन्यात आणखी वाढ होईल, अशी गुंतवणूकदारांना अपेक्षा असल्याने काही प्रमाणात खरेदी करत आहेत.
Discussion about this post