मुंबई । गेल्या काही दिवसापासून सोने दरात वाढ दिसून आली. सराफा बाजारात सोन्याचे भाव अगदी गगनाला भिडले होते. यामुळे ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला फटका बसला आहे. मात्र यातच आज सोमवारी सोन्याच्या दरात किंचित घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर, चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. ऐन अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
आजचे सोने चांदीचे दर
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या दरात २२ रुपयांची घसरण झाली असून, प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ₹९४,९७० वर आला आहे. यापूर्वी सोन्याचा विक्रमी उच्चांक ₹९९,३५८ प्रति १० ग्रॅम इतका होता.
चांदीच्या किमतीतही आज घट झाली आहे. चांदीचा भाव प्रति किलो ५२० रुपयांनी घसरून ₹९६,०३७ वर पोहोचला आहे. चांदीचा आतापर्यंतचा सर्वाधिक दर ₹१,०४,०७२ प्रति किलो इतका होता.
राज्यातील प्रमुख शहरातील आजचा सोन्याचा भाव
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आर्थिक राजधानी मुंबईत २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८७, १८४ रूपये आहे. तर, २४ कॅरेट सोन्याची किंमत ९५, ११० प्रति १० ग्रॅम आहे.
तर, पुण्यात २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८७, १८४ रूपये आहे. तर, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ९५, ११० रूपये इतके आहे.
तसेच नागपुरात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८७, १८४ रूपये आहे. तर, २४ कॅरेट सोन्याचा दर ९५, ११० रूपये इतका आहे.
नाशकातही प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८७, १८४ रूपये आहे. तर, २४ कॅरेट सोन्याचा दर ९५, ११० रूपये इतका आहे.
Discussion about this post