गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर वाढताना दिसत होता. मात्र आज अखेर या दरवाढीला ब्रेक मिळालाय. अमेरिकेतील निवडणूक निकालानंतर दुसऱ्याच दिवशी सोन्याचे दर गडगडल्याचं पाहायला मिळतंय.
दिवाळीनंतर आता लग्नसराईला सुरुवात होणार असून जर तुम्हालाही दागिने बनवायचे असतील तर मोठी संधी आहे. Goodreturns वेबसाईटनुसार, आज गुरुवारी म्हणजेच आज ७ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात घसरण झालीये. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 179 रुपये प्रति 1 ग्रॅम इतकी घसरण झालीये. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1790 रुपयांची घसरण झालीये.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज ७,२१५ रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज ५७७२० रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज ७२१५० रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७८७१० रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ६२९६८ रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं ७८७१ रुपयांनी विकलं जात आहे.