गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होतेय. नवी वर्षापासून सोन्याचे दर गगनाला भिडल्याचं दिसून येतंय. लग्नसराईच्या काळात सोन्याची मागणी वाढतेय. यातच सोन्याचा तोळा पुन्हा 80 हजारांपार गेल्याने खरेदी करणाऱ्यांना घाम फुटला आहे. आज जर तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात.
Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज १७ जानेवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 650 रूपये प्रति तोळा इतकी वाढ झाली आहे. दुसरीकडे चांदी दरातही २ हजार रुपयापर्यंतची वाढ झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,465 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 59,720 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 74,650 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 81,420 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 65,136 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 8,142 रुपयांनी विकलं जात आहे.
आज एक किलोग्रॅम चांदीचे भाव 2000 रुपयांनी वाढले आहेत. देशात एक किलोग्रॅम चांदीचे भाव 95500 रुपये झाले आहेत. वर्ष 2024 मध्ये एक किलोग्रॅम चांदीचे दर 1 लाखांपुढे गेले होते.
Discussion about this post