जगातील अनेक देशांसोबतच्या अमेरिकेच्या व्यापार करारात प्रगतीचे संकेत आणि कर मुदतीत बदल करण्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. त्यातच आज सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रती तोळा ५४० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांना आज सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे. आज १८, २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर किती आहेत ते घ्या जाणून….
गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ५४० रुपयांनी घसरण होऊन ते ९८,२९० वर आले आहे. जीएसटीसह हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १ लाखांवर पैसे खर्च करावे लागणार आहेत. शनिवारी याच १ तोळा सोन्यासाठी तुम्हाला ९८,८३० रुपये खर्च करावा लागला होता. तर आज १० तोळा २४ कॅरेट सोन्याच्या दरात ५,४०० रुपयांनी घट झाली आहे. १० तोळा २४ कॅरेटचे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला आज ९,८२,९०० रुपये खर्च करावे लागतील.
२२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा ५०० रुपयांनी घट झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला आज ९०,१०० रुपये खर्च करावे लागतील. तर २२ कॅरेटचे १० तोळं सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९,०१,००० रुपये खर्च करावा लागेल. तर १८ कॅरेट सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी देखील आज कमी खर्च करावा लागणार आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा ४१० रुपयांनी घट झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ७३,७२० रुपये खर्च करावे लागतील. तर १८ कॅरेटच्या १० तोळे सोन्यासाठी आज ७,३७,२०० रुपये खर्च करावे लागतील.
Discussion about this post