गेल्या काही दिवसात सोन्याचे भाव वाढत असल्याने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. दरम्यान, आज सोन्याच्या भाववाढीला ब्रेक लागला आहे. गु़डरिटर्न्सनुसार, आज सोन्याच्या भावात कोणताही बदल न झाल्याने ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे.
आज २४ कॅरेट सोन्याचे दर ९५,१३० रुपये प्रति तोळा आहे. कालदेखील १ तोळ्याची किंमत एवढीच होते. ८ ग्रॅम सोने हे ७६,१०४ रुपयांवर विकले जात आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत थोडी कमी आहे. २ कॅरेट सोने प्रति तोळा ८७,२०० रुपयांवर विकले जात आहे. तर ८ ग्रॅमची किंमत ६९,७६० रुपये आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत ७१,३५० रुपये प्रति तोळा आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचे दर ५७,०८० रुपये आहे. (Today Gold Rate)
सोने खरेदी करताना नेहमी हॉलमार्कचे सोने घेण्याचा सल्ला दिला जातो. सोन्यात केडीएम आणि हॉलमार्क असे दोन प्रकार असतात. हॉलमार्क हे सोन्याच्या शुद्धतेची हमी देते. हे सोने शुद्ध असते. जर तुम्ही हॉलमार्कचे सोने घेतले तर तुमची फसवणूक होण्याची शक्यता कमी असते. हॉलमार्कच्या दागिन्यांना भारतीय मानक ब्युरो (BIS) कडून प्रमाणपत्र मिळते.
चांदीच्याही दरात कोणतेही बदल झालेले नाही. चांदीचे दर गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहे. ८ ग्रॅम चांदीची किंमत ७७८ रुपये आहे. तर १० ग्रॅम चांदीची किंमत ९७० रुपये झाली आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत ९,७०० रुपये झाली आहे.
Discussion about this post