नवीन वर्षाच्या सुरुवातीपासुन सोने दरात मोठी वाढ दिसून आली आहे. सध्या लग्न सराईचे दिवस सुरु असून या दिवसात बाजारामध्ये सोन्याची मागणी वाढते. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव वाढला होता. तर आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी देखील सोन्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करणारे ग्राहक मात्र चिंतेत आहेत.
Good returns वेबसाईटनुसार, मंगळवारी म्हणजेच आज २५ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 220 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,82,400 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज ८०९० रुपयांना विकलं जात आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज ८०,९०० रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 88,240 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 70,416 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 8,824 रुपयांनी विकलं जात आहे.
Discussion about this post