मुंबई । गेल्या दोन दिवसांपासून सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याचे भाव गडगडले होते. मात्र आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज सोन्याच्या भावात तेजी आली आहे. सोनं पुन्हा एकदा महागलं आहे. त्यामुळे आज सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला मोठा फटका बसू शकतो.
सोने दरात आज जोरदार तेजी पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने दरानं उच्चांक गाठला. आज सोन्याचा दर 80450 रुपये होता. त्यानंतर सोन्याचे व्यवहार 80400 रुपयांवर सुरु होते. सोन्याचा काल दर 80289 रुपये होता.चांदीच्या दरात देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीचा एक किलोचा दर 91137 रुपये इतका आहे.
जळगावच्या सराफा बाजारात देखील सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. सोने दरात वाढ झाल्यानं काही ठिकाणी खरेदीदारांचा कमी प्रतिसाद दिसत आहे.















Discussion about this post