जळगाव । गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीत्या दरात घसरण होत होती. पण आता दोन्ही धातूंच्या दरात तेजी आली आहे. आज गुरुवारी देखील सोन्यासह चांदी दरात मोठी दरवाढ झाली असून ग्राहकांसह व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
लग्नसराईच्या हंगामात गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांकडूनही खरेदी वाढली आहे. या वाढत्या मागणीमुळे दोन्ही धातुंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
जळगाव सराफ बाजारात आज गुरूवारी सकाळी बाजार उघडताच तब्बल २३६९ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३० हजार ०८९ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.
गुरूवारी सकाळी बाजार उघडताच तब्बल ९२७० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह एक लाख ७२ हजार रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.















Discussion about this post