जळगाव : कमजोर झालेला डॉलर आणि अमेरिका – चीन व्यापार युद्ध यावरुन अनिश्चितमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतींनी एक लाखांचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. काल सोमवारी सोन्याचे भाव 1,650 रुपयांनी वाढले आणि जीएसटीसह प्रति तोळ्याचा दर एक लाखावर पोहोचले.
जळगावात सोन्याचे भाव अखेर एका तोळ्याला एका लाखाच्या पुढे गेले आहेत. सराफा बाजारात २१ एप्रिल रोजी सायंकाळी 10 ग्रॅम सोन्याचा भाव अखेर एक लाख २१९ पुढे पोहचला आहे.
सध्या २४ कॅरेट सोने ९७ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. जीएसटीसह सोने एक लाख २१९ रुपये प्रति तोळा झाले आहे. चांदीत १२०० रुपयांची वाढ असून, ती ९७ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
गेल्या सहा दिवसांपासून सोने भावात दररोज वाढ सुरू असून, दि. १५ ते २१ एप्रिल या सहा दिवसांत सोने तीन हजार २०० रुपयांनी वधारले आहे. दि. १५ रोजी सोने ९३ हजार ३०० रुपयांवर होते. दि. १६ रोजी त्यात एकाच दिवसात १६०० रुपयांची वाढ झाली. त्यानंतर वाढ कायम राहत रविवार, दि. २० एप्रिलपर्यंत ते ९५,९०० रुपयांपर्यंत पोहोचले. त्यानंतर सोमवारी सकाळी त्यात ६०० रुपयांची, तर व संध्याकाळी पुन्हा ८०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ९७हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.
Discussion about this post