मुंबई : दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे दर जाहीर केले जातात. त्यानुसार आज सरकारी तेल कंपन्यांनी १ सप्टेंबर रोजी घरगुती गॅस आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमती अपडेट केल्या आहेत. नव्या किंमतीनुसार सिलिंडरचे दर तब्बल १५७ रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. मात्रघरगुती गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) दरात आज कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.
व्यावसायिक गॅस सिलिंडरचे नवे दर किती?
दरम्यान, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १५७ रुपयांची कपात केल्यानंतर दिल्लीत व्यावसायिक गॅसची किंमत १५२२.५० रुपये इतकी झाली आहे. याआधी दिल्लीत गॅस सिलिंडर १६८० रुपयांना मिळत होता. कोलकातामध्ये आजपासून सिलिंडर १८०२.५० रुपयांऐवजी १६३६ रुपयांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे, यापूर्वी त्याची मुंबईत किंमत १६४९.५० रुपये होती, जी आता १४८२ रुपयांवर आली आहे.
अलीकडच्या काळात गगनाला भिडलेल्या महागाईमुळे जनतेच्या अडचणी वाढल्या होत्या, मात्र आता सरकारच्या या निर्णयाने सामान्य जनतेला थोडा दिलासा मिळेल. दरम्यान, ३३ कोटी ग्राहकांसाठी २०० रुपयांनी सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली होती.
Discussion about this post