बिहारमध्ये सध्या विचित्र प्रेमाचा आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. एक मुलगी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी संपूर्ण गावाची वीज खंडित करत होती.दरम्यान, एकेदिवशी प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी गावी पोहोचला होता. त्यानंतर गावकऱ्यांनी त्याला पकडले आणि नंतर त्या मुलाला बागेत नेऊन बेदम मारहाण केली. हा प्रकार बेतियाच्या नौतन पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील आहे.
प्रियकराला मारहाण केल्याचा आणि तरुणीची गावकऱ्यांशी भांडण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुलगी आपल्या प्रियकराला वाचवण्यासाठी गावातील मुलांचा कसा सामना करते.
याप्रकरणी गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, ही मुलगी संपूर्ण गावाची वीज तोडायची. यानंतर अंधाराचा फायदा घेत तिचा प्रियकर तिला भेटण्यासाठी पोहोचायचा. येथे वीज खंडित झाल्यानंतर गावात चोरीच्या घटना वाढल्या होत्या. गावातील अनेक लोकांच्या मोटारसायकल, सायकली, धान्य व इतर साहित्य गायब होऊ लागले. त्यावेळी गावातील लोक यामुळे जागरुक होते. त्यानंतर दोघांना रंगेहात पकडले, त्यानंतर त्यांना मारहाण करून व्हिडिओ व्हायरल केला.
Discussion about this post