बुलढाणा । राज्यात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत असून अशातच मुंबई नागपूर हायवेवर मालकापूर नजीक कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कार मधील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इरटीगा कंपनीची चारचाकी कार राष्ट्रीय महामार्गावरून धुपेश्वरकडून मलकापूरकडे येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या झाडाला जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की वाहनाचा चक्काचूर झाला.
या अपघातात रुद्र उमेश पवार (वर्षे १९), विनायक जनार्दन अत्तरकर (वय १९), गणेश दीपक इंगळे (वर्षे १८) यांचा मृत्यू झाला आहे. तर प्रशांत राजू वणारे (वर्षे २१), आणि तक्ष धुरंदर (वर्षे १९) हे गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान, गंभीर जखमी असलेल्या गणेश दीपक इंगळे यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे मलकापूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.















Discussion about this post