भुसावळ । केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. त्यात एक संशयित हा अल्पवयीन असल्याने अल्पवयीन संशयीताची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे तर या प्रकरणातील मुख्य संशयित अनिकेत भोई याच्यासह अनुज पाटील व चेतन भोई या तीन संशयतांना भुसावळ जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या तिघा संशयित आरोपींना ५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
खडसे यांच्या मुलीची छेड काढणाऱ्यांविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात एकूण सात जणांवर गुन्हा नोंदवला होता. त्यापैकी चौघांना अटक केली आहे. त्यात एक अल्पवयीन आहे. फरार आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना झाले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. दुसरीकडे अटक आरोपींना भुसावळ जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तिघांना ५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी, तर अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं.
Discussion about this post