चोपडा । तालुक्यातील सत्रासेन गावाजवळ ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत दुचाकींवरील तिघांकडून एक गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुसं हस्तगत केली आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राकेश पाटील, रावसाहेब पाटील, प्रदीप शिरसाठ यांनी केली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत त्यांच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला
या तिघांमधील दोघे जण जळगाव शहरातील असून अन्य एक जण चोपडा तालुक्यातील आहेत. जळगाव शहरातील पिंप्राळा येथील मनीष सम्राट थांबेत (१९), इंद्रनील सोसायटी,खोटेनगर येथील नितीन प्रमोद बोरसे(१९) व चोपडा तालुक्यातील गौऱ्यापाडा येथील भाईदास लालचंद पावरा(२०) हे तिघेही दोन मोटारसायकल वरून उमर्टीहुन सत्रासेन मार्गे चोपड्याकडे जात होते.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण पोलिसांनी तिघे जणांना सत्रासेन गावाजवळ थांबवून त्यांची झाडाझडती केली असता मनीष थांबेत यांचा ताब्यात एक गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुसं आढळून आले.पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत त्यांच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हवालदार गणेश पाटील करीत आहेत.घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Discussion about this post