जळगाव । जिल्ह्यात मागील काही काळापासून पोलिसांच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गावठी पिस्तूल आढळून आले. आता अशातच चोपडा ग्रामीण पोलीसांनी ३ गावठी पिस्तूल आणि ८ जिवंत काडतूसासह तिघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ८ लाख ८२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई चोपडा तालुक्यातील बुधगाव येथे केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुधगाव येथे एका कारमधून काही जण अंधाराचा फायदा घेत २ गावठी पिस्तूल आणि ८ जिवंत काडतूस घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली .त्यानुसार पथकाने शुक्रवार २३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजता चोपडा तालुक्यातील बुधगाव येथे सापळा रचला.
त्यावेळी पोलिसांनी कार क्रमांक (एमएच-१२ आरएफ १४९६) ही कार थांबविली. कारची झाडाझडती घेतल असता तिन जणांकडून ३ गावठी पिस्तूल आणि ८ जिवंत काडतूस आढळून आले. पोलीसांनी तिघांना अटक केली. पोलीसांनी गुन्ह्यात वापरलेली कार, ३ गावठी पिस्तूल आणि ८ जिवंत काडतूस असा एकुण ८ लाख ८२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकणी जफर रहीम शेख वय-३३, तबेज ताहीर शेख व-२९ आणि कलीम अब्दुल रहमान सय्यद वय-३४ तिघे रा. शिरूर जि.पुणे यांच्याविरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post