पारोळा । पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणात तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. यात दोघे सख्खे भाऊ तर दुसरा त्यांच्या आतेभावाचा समावेश आहे. अन्य दोघा जणांना वाचवण्यात यश आले. मोहंमद एजाज नियाज मोहंमद मोमीन (वय १२), मोहंमद हस्सान नियाज मोहंमद मोमीन (वय १६, दोघेही रा. बडा मोहल्ला, ता. पारोळा), आदेश रजा शाह मोहंमद जैनोद्दीन (वय १४, रा. मालेगाव) अशी तिघा मृतांची नावे आहेत.
पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळच वंजारी दर्गा आहे. तिथे दर्शनासाठी ते गेले होते. तिथे आल्यानंतर ते धरणावर चिखलाचे पाय धुण्यासाठी गेले. त्यातले तिघे एजाज, त्याचा भाऊ हस्सान व त्यांचा आतेभाऊ आवेश हे कपडे काढून पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे बुडू लागले. वृत्त कळताच नातेवाइकांनी कुटीर रुग्णालयात गर्दी केली.
मृत मुलांच्या वडिलांचा साडी विक्रीचा व्यवसाय असून ते मुंबईला गेले होते. त्यांना तीन मुले असून मृत दोघे भावंडे लहान असल्याची माहिती बडा मुहल्ला भागातील नातेवाइकांनी दिली. मालेगाव येथील आवेश हा निहाज मोहंमद यांचा भाचा असून तो पारोळा येथे खास उरूस संदलसाठी आला होता.
Discussion about this post