जळगाव । एका व्यक्तीला रूमवर बोलावत त्याच्यासोबत काही अश्लील व्हिडिओ तयार करून ६५ हजारात गंडवल्याचा प्रकार समोर आला होता. शहर पोलिस ठाण्यात एका महिलेसह तिच्या साथिदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तिघांना अटक केली असून संशयीत महिलेचा शोध सुरु आहे.
आव्हाणे (ता. जळगाव) येथील लक्ष्मी जिनींग मिलमध्ये वास्तव्यास असलेल्या राजेंद्र प्रसाद रामपती यादव (वय ४८) या परप्रांतीय गृहस्थाला महिलांशी मैत्रीच्या नावे हेरून तहसील कार्यालयाजवळ एका इमारतीत बोलावुन घेतले. त्याच्यासोबत शरीरसंबंध करतानाचे व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करण्यात आले. यानंतर त्या व्हिडिओच्या आधारे यादव यांना ब्लॅकमेलिंग करत १० हजार रोख व अंगठी असा एकुण ६५ हजारांचा ऐवज लूटले. या नंतर ५० हजारांसाठी पुन्हा ब्लॅकमेलिंग सुरु होते. त्रासलेल्या यादव यांनी शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली होती.
दाखल तक्रारीत सहाय्यक निरीक्षक किशोर पवार यांच्यासह पोलिस पथकाने संशयीतांचा शोध घ्यायला सुरवात केली. या दरम्यान उमेश सुरेश बारी (वय २९), प्रमोद पंडीतराव कुळकर्णी (वय ७३) आणि या टोळीची महिला साथीदाराला अटक करण्यात आली असुन गुन्ह्यातील मुख्यसुत्रधार महिला मात्र फरार झाली आहे.
Discussion about this post