जळगाव स्थानिक गुन्हा शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. चोरी केलेल्या दुचाकीवर फिरणाऱ्या एका चोरट्याला पकडले. त्याने दोन साथीदारांची नावे सांगितली. त्या तिघांकडून १४ मोटारसायकली, ६ रिक्षा अशी २० वाहने पोलिसांनी हस्तगत केले. याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या दुचाकीवर फिरणाऱ्या एका चोरट्याला पकडले. त्याने त्याच्या दोन साथीदारांची नावे सांगितली. त्या तिघांकडून १४ मोटारसायकली, ६ रिक्षा अशी २० वाहने पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हा शाखेच्या निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, श्रीकृष्ण पटवर्धन आदींच्या पथकाने चोरीच्या गाड्यांची लिंक पाळधीत असल्याचे कळले. त्यांनी तेथे जाऊन लक्ष ठेवून शनिनगर भागात राहणारा मुस्तकीम अजिज पटे (वय २८) हा जळगाव शहर पोलिस ठाण्यात चोरीला गेलेली मोटारसायकल वापरत असताना दिसला.
दरम्यान त्याला विचारपूस केल्यावर त्याने अमीन कालु मनियार, (वय ३९, रा. रंगारी मोहल्ला, पाळधी) व जाबीर सलामत शेख (वय २७, रा. ईदगाह प्लाट, पाळधी) यांची नावे सांगितली. चोरट्यांनी २२ लाख ४० हजार रुपयांच्या एकूण १४ मोटारसायकली व ६ ऑटो रिक्षा चोरल्या आहेत. त्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने हस्तगत केल्या. चोरट्यांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे
Discussion about this post