जळगाव । जळगावच्या रावेर तालुक्यातील चिनावल येथील कोचूर रस्त्याला लागून जुन्या सावदा रस्त्यावरील खेमा कामा पाटील यांनी नवीन लागवड केलेले केळीचे ३५०० खोड अज्ञात व्यक्तींनी कापून फेकल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सावदा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
खेमा पाटील या शेतकऱ्याने मे महिन्यात लाखो रुपये खर्च करून केळीचे बेणे, ठिबक सिंचन व आंतर मशागतसाठी कर्ज उचलून केळीची लागवडी केली होती. रात्री अज्ञातांने त्यांच्या शेतातील पाठच्या पटावरील ३५०० केळी खोड खालून कापून फेकून दिल्याने मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी शेतकऱ्याने सावदा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
त्यानंतर सपोनी विशाल पाटील, विनोद पाटील, मजहर तडवी व कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन नुकसानीचे पाहणी केली. तसेच पंचनामा करून पोलिसात नोंद करून घेतली. चिनावल तलाठी, मंडळ अधिकारी अमोल चौधरी यांनी तहसीलदार यांनाही माहिती देऊन शेतकऱ्याच्या नुकसानीला कारणीभूत असलेल्या व्यक्तींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला. कृत्य करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.















Discussion about this post