भुसावळ | आमदार संजय सावकारे यांचे बंधू तथा कॉटन सेलचे संचालक प्रमोद सावकारे यांना शनिवारी (दि. १) एकाने मोबाइलवरून आठ ते नऊ कॉल करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी रविवारी मध्य प्रदेशातील नेपानगरातून पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.
शनिवारी (दि. १) सकाळी कॉटन सेलचे संचालक प्रमोद सावकारे हे वाल्मीक नगरातील बारसे कुटुंबीयांकडे सांत्वनासाठी गेले होते. तेथून घरी आल्यानंतर दुपारी १.३८ वाजता त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलरने ‘तुम्ही या प्रकरणात सहभागी होऊ नका अन्यथा जीवे ठार मारू’ अशी धमकी दिली होती. प्रमोद सावकारे यांनी सायंकाळी बाजारपेठ पोलिसात अनोळखी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी धमकीचा प्रकार गांभीयनि घेत संशयित रवी आर.के. यास नेपानगर (मध्यप्रदेश) येथून रविवारी दुपारी ताब्यात घेतले. सायंकाळी त्याची पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांनी चौकशी केली.















Discussion about this post