मुंबई | महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे स्टेशनचं नामांतर करण्यात आले आहे. औरंगाबाद रेल्वे स्थानकाला आता ‘छत्रपती संभाजीनगर’ नाव देण्यासंदर्भात राजपत्र जारी केलंय.
दोन वर्षापूर्वी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं होतं. काही दिवसांनी संपूर्ण जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं होतं. त्यावेळी औरंगाबादसह उस्मानाबाद जिल्ह्याचं नामांतर धाराशिव करण्यात आलं होतं. त्यावेळी राज्य सरकारने राजपत्र प्रकाशित करून दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलल्याचे जाहीर केले होते.
औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर झालं असलं, तरी रेल्वे स्थानकाचं नामांतर झालं नव्हतं. आता महाराष्ट्र सरकारने केंद्रीय अधिनियमान्वये यासंदर्भात नियम आणि आदेश लागू करत ‘छत्रपती संभाजीनगर’ नाव रेल्वे स्थानकाला देण्यासंदर्भात राजपत्र जारी केलंय. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रातील औरंगाबाद रेल्वे स्टेशनचं नाव हे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे असे होईल.















Discussion about this post