धरणगाव । तालुक्यातील बांभोरी येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही मैत्रिणीच्या घरी गळ्यातील हार देऊन येते असे सांगून गेली होती. त्यानंतर ती सायंकाळपर्यंत परत आली नाही.
तिच्या नातेवाईकांनी अल्पवयीन मुलीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तिच्याबाबत कोणतेही माहिती मिळाली नसल्याने रात्री ११ वाजता पीडित मुलीचे वडील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन महाजन करीत आहे.
Discussion about this post