सर्वजण हंगामी फळे खातात. हिवाळ्यात शिंगाडं (वॉटर चेस्टनट ) खाणं इतर हंगामी फळांप्रमाणेच तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. हिवाळी हंगाम सुरू होताच बाजारात शिंगाड्याची विक्री सुरू झालीय. हे असं फळ आहे, जे पावसाळ्यात उगवतं आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला बाजारात येऊ लागतं. मात्र असे बरेच लोक आहेत ज्यांनी शिंगाडं खाऊ नये. लोकांना थंड हवामानात शिंगाडं खायला आवडते पण ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीराला मोठी हानी होते. ज्यांच्या पोटात सूज आहे त्यांनी हे खाऊ नये.
घसा खवखवणे
ज्या लोकांना घशाची समस्या आहे किंवा घसा खवखवत आहे त्यांनी देखील याचे सेवन टाळावे. त्यामुळे घशात जास्त त्रास होऊ शकतो.
खोकला
थंडीमध्ये खोकला होतो, त्यामुळे ज्यांना खोकल्याचा त्रास आहे त्यांनीही शिंगाडं खाणे टाळावे. त्याचा प्रभाव थंड आहे.
थंड
शिंगाडं थंड असतात, त्यामुळे जर तुम्हाला सर्दीचा त्रास होत असेल तर तुम्ही ते खाऊ नये. जर खायचेच असेल तर कमी प्रमाणात खावे.
पोटाशी संबंधित समस्या
ज्या लोकांना पोटाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी याचे सेवन अजिबात करू नये, अन्यथा तुम्हाला डायरियाचा त्रास होऊ शकतो.
Discussion about this post