जळगाव । राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली असून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात आली आहे. यातच जळगाव जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार घोषित झाले आहेत. यातील काही उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यामध्ये जळगाव ग्रामीणमधून शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आज धरणगावमध्ये मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या तिकिटावर महायुतीचे उमेदवार म्हणून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी रोहिणी खडसेंवर टोला लगावला. गेल्या पाच वर्षांमध्ये केलेले विकास कामे आणि जनतेचे प्रेम यावर मी भरघोस मताधिक्याने निवडून येईल असा आत्मविश्वास देखील त्यांनी व्यक्त केला, तर माझ्या विरोधकांना अजून पर्यंत एबी फॉर्म मिळाला मिळाला नाही असा टोला आमदार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांना यावेळी बोलताना लावला आहे.
सोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यात भाजपचे खासदार स्मिता वाघ यांची उपस्थिती होती. दरम्यान, या निवडणुकीत 40 ते 50 हजार मताधिक्याने पुन्हा विजयी होईल असा विश्वास मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Discussion about this post