जळगाव । उन्मेष पाटील गळाला लावल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गट जळगावत भाजपला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. भाजपच्या 30 नगरसेवकांवर ठाकरे गटाने जाळं फेकलं असल्यांचं उघड झालं असून एका फोटो समोर आल्याने जळगावत राजकीय भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
ठाकरे गट जळगाव महापालिकेतील भाजपचे नगरसेवक फोडणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चेनंतर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावून त्यांना तंबी दिल्याचं वृत्त आहे.बंददाराआड झालेल्या बैठकीचा फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावेळी मंत्री महाजन यांनी नगरसेवकांची झाडाझडती घेतल्याचंही सांगण्यात आलं आहे. प्रत्येक नगरसेवकांना मतांचं टार्गेट दिल्याचं बोललं जातंय. तुमच्या मतदारसंघातून मताधिक्य मिळालं तरच तुम्हाला महापालिकेचं तिकीट देऊ, नाही तर नाही. त्यामुळे तुम्हाला मताधिक्य द्यावच लागणार आहे, असा दमही महाजन यांनी नगरसेवकांना भरल्याचं सूत्रांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाकरे गटाची आणि उन्मेष पाटील समर्थकांची बैठक झाली. त्यात भाजपचे 30 पैकी जास्तीत जास्त नगरसेवक फोडण्याची मोठी जबाबदारी महापालिकेत लोकप्रतिनिधी असलेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर देण्यात आलीय. त्यानंतर मंत्री गिरीश महाजनांनी तातडीने भाजपच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना पक्षातच राहण्याच्या सूचना दिल्याचं सांगितलं जात आहे. या बंद दाराआड झालेल्या बैठकीत महाजन यांनी नगरसेवकांना पक्ष सोडून न देण्याची तंबीही दिल्याचं सांगण्यात येतं.
Discussion about this post