मुंबई । महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्रातील विधानसभेच्या पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे
यामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेली बारामती आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेली राहुरी या दोन जागांवर ही निवडणूक होणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून, ही निवडणूक बिनविरोध होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे राहुरी मतदारसंघातही आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होऊ शकते. निवडणूक आयोगाकडून या दोन्ही जागांसाठी अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून, यामुळे राजकीय हालचालींना वेग मिळाल्याचे दिसून येत आहे.















Discussion about this post