Saturday, March 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

… तर व्यवसाय-उद्योगात यश निश्चित प्राप्त होईल ; उद्योजक नितीन बंग

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 7, 2023
in जळगाव जिल्हा
0
… तर व्यवसाय-उद्योगात यश निश्चित प्राप्त होईल ; उद्योजक नितीन बंग
बातमी शेअर करा..!

जळगाव। तरूणांनी आपल्यातील क्षमता ओळखुन व्यवसाय करण्यासाठी पावले टाकावीत. मात्र व्यवसायात होणारे बदल स्वीकारून मेहनत आणि कष्ट करण्याची जोड दिली तर व्यवसाय-उद्योगात निश्चित यश प्राप्त होईल असे मत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (CAIT) अध्यक्ष व उद्योजक नितीन बंग यांनी व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्यावतीने विद्यापीठ – उद्योग संवाद शिखर परिषदेचे आयोजन मंगळवार दि. ७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन करतांना श्री. बंग बोलत होते. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक तथा विन्ले पॉलीमर्सचे मुख्य कार्यकारी प्रमोद संचेती, सोयो सिस्टीमचे मुख्य कार्यकारी किशोर ढाके उपस्थित होते तर अतिथी म्हणून रवीकिरण कोंबडे तसेच प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांची उपस्थिती होती. या संवाद शिखर परिषदेला विद्यापीठ प्रशाळांमधील ३०५ विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून मोठा प्रतिसाद दिला. श्री. बंग म्हणाले की, भविष्यात नोक-यांची संधी कमी होत चालली आहे अशा वेळी आपल्यातील क्षमता ओळखुन संधीचा शोध घ्यायला हवा, चरितार्थाची साधने आपण शोधायलाच हवीत. प्राप्त झालेल्या टक्केवारीपेक्षा क्षमता आणि अनुभव यांना अधिक महत्व आहे. क्षमतेनुसार व्यवसाय करा. यश-अपयशाची पर्वा करू नका. व्यवसायात लवचिकता ठेवा. नवीन बदल स्वीकारा आणि मित्रांच्या संपर्कात सतत राहा. कारण त्यातुन व्यापार वाढीला मदत होते. सकारात्मक विचार आणि मेहनत व कष्ट करण्याची तयारी यातूनच यशस्वी व्हाल असा मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

उद्योजक प्रमोद संचेती यांनी स्वप्नाला मेहनतीची जोड देण्याचा सल्ला दिला. व्यवसायातील तंत्रज्ञान अवगत केले तर स्पर्धेत टिकून रहाल असे सांगताना त्यांनी उद्योगांना हवे असणारे कुशल मनुष्यबळ मिळत नाही अशी खंत व्यक्त केली. किशोर ढाके यांनी उद्योगाच्या गरजा आणि सध्याचे दिल जाणारे शिक्षण यामध्ये मोठी दरी असुन कौशल्य नसलेले मनुष्यबळ तयार होते. विद्यार्थ्यांकडे संवाद कौशल्य, सकारात्मक विचार यांचा अभाव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिकत असतांना केवळ पाठांतर न करता व्यावहारिक दृष्टीकोन ठेवावा असे आवाहन त्यांनी केले. रवीकिरण कोंबडे म्हणाले की, भारताकडे मोठी क्षमता असलेला देश म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे तरूण पिढीची जबाबदारी वाढली असून विद्यापीठांकडून उद्योगांना हवे असलेले कुशल मनुष्यबळ पुरवण्याची जबाबदारी आहे. कौशल्य असलेले मनुष्यबळ प्राप्त व्हावे यासाठी विद्यापीठाने त्या पध्दतीचे अभ्यासक्रम आखावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी हे विद्यापीठ तिन्हीही जिल्ह्यातील प्रत्येक समाज घटकांचे विद्यापीठ असुन सर्व घटकांशी संवाद वाढविण्याचा विद्यापीठाकडून प्रयत्न कला जात आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात इंटर्नशिपला महत्व असल्यामुळे उद्योजकांच्या पाठिंब्याची विद्यापीठाला गरज आहे. विद्यापीठात उत्तम प्रयोगशाळा आहेत, संशोधन आहे आणि विश्लेषण करण्याची क्षमता आहे. त्यांचा फायदा या भागातील उद्योजकांनी करावा असे आवाहन प्रा. माहेश्वरी यांनी केले. प्रारंभी सीटीपीसीचे समन्वयक प्रा. रमेश सरदार यांनी प्रास्ताविकात परिषदेच्या आयोजनामागील भुमिका सांगितली. प्रा. जी. ए. उस्मानी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. यश सोनवणे, सोनाली दायमा व प्रा. सरदार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपसमन्वयक प्रा. उज्ज्वल पाटील यांनी आभार मानले.

उद्घाटनानंतरच्या झालेल्या चर्चेत संतोष शिवाने (पुणे), संदीप जोशी (संभाजीनगर), गौसुद्दीन खान (हैद्राबाद), मोहम्मद फारूख खान (संभाजीनगर) तसेच उमेश सेठीया, सुरज धाजल, भाऊसाहेब चिमाटे, संजय पानीकर, डॉ. देवदत्त गोखले, संजय पवार, अरूण महाजन, हिमांशु उके, विरेंद्र छाजेड, प्रवीण सिंग, संजय शहा, संतोष बिरारी, रश्मी गोखले, रोहन मंत्री, भास्कर माळी, अनिल पवार, डॉ. जितेंद्र नारखेडे, डॉ. विशाल पराते, पवन मेश्राम यांनी भाग घेतला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शेतकरी असल्याने लग्न जुळत नाही, विवंचनेतून तरुणांने उचलले धक्कादायक पाऊल

Next Post

राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर ; जळगाव विद्यापीठाला चार पुरस्कार प्राप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर ; जळगाव विद्यापीठाला चार पुरस्कार प्राप्त

राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर ; जळगाव विद्यापीठाला चार पुरस्कार प्राप्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

March 14, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 25 वर्षे पक्षात राहिलेल्या ‘या’ नेत्याने सोडली काँग्रेसची साथ

March 14, 2026
त्या बेपत्ता तरुणाच्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा; प्रेमप्रकरणातून खून, पती-पत्नीला अटक

त्या बेपत्ता तरुणाच्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा; प्रेमप्रकरणातून खून, पती-पत्नीला अटक

March 14, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

भारतीयांना महागाईचा दुहेरी धक्का; गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागणार?

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page