जळगाव – मराठी रंगभूमी दिना निमित्ताने आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे रंगकर्मींच्या उपस्थितीत रंगदेवता नटराज तसेच तबला, पेटी आणि रंगरंगोटी पेटी (मेकअप बॉक्स) पूजन करून रंगभूमीला वंदन करण्यात आले. या पूजनाचा नारळ ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील (मास्तर) यांच्या हस्ते फोडण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. उल्हास कडूस्कर लिखित शब्द सुरांच्या रेशीम गाठी या नाटकातील नांदीने झाली. खान्देश नाट्य प्रतिष्ठानचे दुष्यंत जोशी आणि संजय कुलकर्णी यांनी नांदी सादर केली. तबल्यावर मोहन रावतोळे आणि संवादिनीवर भूषण खैरनार यांनी साथ दिली. या प्रसंगी सर्व रंगकर्मीनी नटराजाला वंदन करून मराठी रंगभूमीच्या परंपरेला अभिवादन केले.
यांची होती उपस्थिती?
कार्यक्रमाला ज्येष्ठ रंगकर्मी पियुष रावळ, विनय काबरा, संजय निकुंभ, चंद्रकांत अत्रे, गुलाब शेख, चंद्रकांत चौधरी, अरुण सानप, शरद पांडे, विनोद ढगे, अनिल मोरे, जगदीश नेवे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद , मुंबईच्या नियामक मंडळ सदस्या गीतांजली ठाकरे सुभाष मराठे, शरद भालेराव, आकाश बाविस्कर, प्रदीप भोई, अविनाश चव्हाण, भगवंत फडणीस, महेंद्र खेडकर, पवन खंबायत, बळवंत गायकवाड, नेहा पवार, शुभदा नेवे, मानसी नेवे, धनंजय राजहंस, अविनाश मोघे, विजय पाठक, प्रा. सुधीर भटकर, योगेश शुक्ल, बोरसे दादा, गणेश सोनार, सचिन महाजन, सुभाष गोपाळ, नितीन तायडे, सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, तुषार वाघुळदे, मोहीत पाटील आणि अमोल ठाकूर आदींची उपस्थिती होती.















Discussion about this post